मुंबई -माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरोधातील एक रिपोर्ट तयार झाला होता. तो त्यांनी उघड करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात डिटेंशन कॅम्प उभारले जात आहेत त्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, असेही आंबेडकर म्हणाले. शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
एनआरसी आणि कॅब मुळे फक्त मुस्लिमच नाहीतर 40 टक्के देखील हिंदुदेखील बाधित होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एनआरसी विधयेकाच्या विरोधात असतील तर त्यांच्या काळात आरएसएसच्या कार्यकर्त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण आरएसएसने दिले होते. याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. तो त्यांनी उघड करावा, असे आवाहन वंबआचे आंबेडकर यांनी चव्हाण यांना केले आहे.