ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता फुफ्फुसांच्या आजाराबाबत नो टेन्शन, आरोग्य विभाग करणार ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ - आरोग्य विभाग प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास न्यूज

कोरोना काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का? याच्या चाचणीसाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यावर भर देणार येणार आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या आजाराबाबत चिंतेत असणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.

Mumbai
Mumbai
author img

By

Published : Apr 19, 2021, 4:15 PM IST

मुंबई : कोरोना काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का? याच्या चाचणीसाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यावर भर देणार येणार आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या आजाराबाबत चिंतेत असणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणेची नुकतीच आढावा बैठक पार पडली. दरम्यान, 'जिल्हा आरोग्य यंत्रणांनी नागरिकांचे प्रबोधन करण्याबरोबरच सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करावी. ज्यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल आणि गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल. त्यासाठी चाचणीवर भर द्यावा', असे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यंत्रणांना दिले.

चाचणी कोणी करावी ?

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

अशी करावी चाचणी -

चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). या दरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.

सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी. जेणेकरून काही बदल होतो का? ते लक्षात येईल.

चाचणीचा निष्कर्ष -

सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यामध्ये ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.

ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details