महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकुमारी रत्ना सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका - mumbai ratna sing news

राजकुमारी रत्नासिंह हिने मुंबई उच्च न्यायालयात पती जय सिंह सिसोदिया यांच्या संपत्तीला स्वतःला कायदेशीर संरक्षक नेमण्यासाठी याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे राजकुमारी रत्ना सिंह यांनी या अगोदरही अशा प्रकारची याचिका दाखल केली होती. जी 12 जानेवारी रोजी मागेसुद्धा घेतली होती.

princess-ratna-singh-file-petition-again-in-mumbai-high-court
राजकुमारी रत्ना सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका

By

Published : Jan 29, 2021, 7:27 PM IST

Updated : Jan 29, 2021, 7:42 PM IST

मुंबई -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी परराष्ट्रमंत्री दिनेश सिंग यांची मुलगी राजकुमारी रत्नासिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात पती जय सिंह सिसोदिया यांच्या संपत्तीला स्वतःला कायदेशीर संरक्षक नेमण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सय्यद व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे राजकुमारी रत्ना सिंह यांनी या अगोदरही अशा प्रकारची याचिका दाखल केली होती. जी 12 जानेवारी रोजी मागेसुद्धा घेतली होती.

यामुळे संपत्ती विषयीचा कायदेशीर हक्क मिळावा -

राजकुमारी रत्ना सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, त्या मुंबईतील ब्रीच कँडी परिसरांमध्ये राहत असून त्यांचे पती हे सध्या डायबिटीज व नशेच्या आहारी गेल्यामुळे वसईतील एका रेहाबिलिटेशन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. राजकुमारी रत्नसिंह यांचे पती सध्या लिव्हरच्या आजारामुळे आजारी असून त्यांना कॅन्सरसुद्धा असल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. राजकुमारी रत्ना सिंग यांचे पती हे राजस्थानमधील शाही घराण्यातून असून महाराणा प्रतापचे वंशज असल्याचे त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. या अगोदर 2017 मध्ये त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते व त्यांची सासू ही ब्रिटिश नागरिक असून ती सध्या कॅनडात राहत आहे. वय झाल्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. यामुळे संपत्ती विषयीचा कायदेशीर संरक्षक हक्क त्यांना मिळावा म्हणून त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत राजकुमारी रत्ना सिंग यांच्या मुलांना पक्षकार करण्याचा आदेश देत पुढील सुनावणी 3 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.

हेही वाचा - कोल्हापूर - आयुक्त कार्यालयात ‌अ‌ॅटम बॉम्ब फोडणार, आपने दिला इशारा

Last Updated : Jan 29, 2021, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details