महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रिटनच्या राजकुमाराने लहानग्यांसह साजरा केला वाढदिवस; प्रिन्स चार्ल्स यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस - birthday

काल (१३ नोव्हेंबर) प्रिन्स चार्ल्स यांचे दिल्लीत आगमन झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काल गुरु नानक यांची जयंती होती. त्यानिमित्त त्यांनी दिल्लीतील बंगाल साहीब गुरुद्वाऱ्याला भेट दिली. या गुरुद्वाऱ्यात त्यांनी स्वतः लंगर वाटण्यात सहभाग घेतला. तसेच, मुदपाकखान्यात चपात्या बनवतानाही ते दिसले. या दौऱ्यात ते द्विपक्षीय संबंधावर चर्चा करणार आहेत.

प्रिन्स चार्ल्स मुलांसमवेत

By

Published : Nov 14, 2019, 1:19 PM IST

Updated : Nov 14, 2019, 2:41 PM IST

मुंबई - ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. चार्ल्स यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस त्यांनी मुंबईतील एका शाळेत लहान मुलांसह साजरा केला. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात द्विपक्षीय संबंधावर ते चर्चा करणार आहेत.

प्रिन्स चार्ल्स यांनी एका शाळेमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासह शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले. आपल्या गळ्यात पुष्पहार घातलेले चार्ल्स छायाचित्रात दिसत आहेत. तसेच, त्यांच्या भोवती लहानग्यांनी गराडा घातला आहे. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात काल दिल्लीला भेट दिल्यानंतर ते आज थेट मुंबईत दाखल झाले आहेत.

हेही वाचा -अखेर शिवसेनेच्या आमदारांची सुटका; 6 दिवसांपासून होते हॉटेलमध्ये

काल (१३ नोव्हेंबर) प्रिन्स चार्ल्स यांचे दिल्लीत आगमन झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काल गुरु नानक यांची जयंती होती. त्यानिमित्त त्यांनी दिल्लीतील बंगाल साहीब गुरुद्वाऱ्याला भेट दिली. या गुरुद्वाऱ्यात त्यांनी स्वतः लंगर वाटण्यात सहभाग घेतला. तसेच, मुदपाकखान्यात चपात्या बनवतानाही ते दिसले. या दौऱ्यात ते द्विपक्षीय संबंधावर चर्चा करणार आहेत.

प्रिन्स चार्ल्स आणि भारत
प्रिन्स चार्ल्स हे भारतीयांसाठी नवीन नाहीत. या आधी ते ९ वेळा भारत भेटीवर आले आहेत. ही त्यांची १० वी भेट आहे. दोन वर्षांपूर्वीच चार्ल्स सपत्नीक भारत भेटीवर आले होते. त्यामुळे भारत आणि चार्ल्स यांचे संबंध जुने आहेत. भारतीयांनाही चार्ल्स यांचा चेहरा ओळखीचा आहे.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांसह सर्व मंत्र्यांना मंत्रालयातील दालने खाली करण्याचे आदेश

मुंबईचे डबेवाले आणि चार्ल्स
मुंबईचे डबेवाले हे जगात नावाजले गेले आहेत. या डबेवाल्यांचाही प्रिन्स चार्ल्स यांच्याशी ऋणानुबंध आहे. २०१७ ला चार्ल्स यांना नातू झाला होता. तेव्हा येथील डबेवाल्यांनी त्यांच्या नातवासाठी भेटवस्तू पाठवली होती. या भेटवस्तूत मारुतीची प्रतिमा पाठवण्यात आली होती. चार्ल्स यांचा नातू मारुतीसारखा बलवान व्हावा अशी इच्छा डबेवाल्यांनी व्यक्त केली होती. प्रिन्स चार्ल्स यांनी डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राची प्रशंसा केली होती. त्यानंतर डबेवाल्यांना जगात ओळख प्राप्त झाली होती. त्यामुळे डबेवाल्यांसाठी प्रिन्स चार्ल्स यांची मदत झाल्याची डबेवाल्यांची भावना आहे.

Last Updated : Nov 14, 2019, 2:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details