महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vande Bharat Express: मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण काही तासांवर; रेल्वे कर्मचारी देत आहेत फायनल टच - Prime Minister Narendra Modi

कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालवण्यात येणाऱ्या सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी गोवा राज्यातील मडगाव स्थानकावरून सुटेल. याचा शेवटचा थांबा हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असणार आहे.

Madgaon Mumbai Vande Bharat Express
मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस

By

Published : Jun 2, 2023, 9:20 PM IST

मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पणाची तयारी सुरू

मुंबई (मडगाव ):भारतीय रेल्वेत शनिवारी 19वी, महाराष्ट्रातील 5वी आणि मुंबईतील 4थी वंदे भारत एक्सप्रेस सामील होणार आहे. ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रत्यक्ष उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवणार आहेत.



पर्यटनाला मिळणार चालना: रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक गोव्यात जातात. ज्यामध्ये पर्यटक आणि नोकरी, व्यवसाया निमित्ताने लोक जास्त राहतात. त्यांच्या सोयीसाठी या नागरिकांच्या सेवेसाठी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे. ही देशातील 19वी वंदे भारत ट्रेन असणार आहे. तसे पाहता या मार्गावर राजधानी आणि दुरांतो सारख्या व्हीआयपी गाड्या आधीपासूनच आहेत, परंतु त्यांना मुंबई CSMT ते मडगाव हे अंतर पार करायला सुमारे 9 तास लागतात. अशा स्थितीत या मार्गावर वंदे भारत सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन सुमारे 7 तासात आपला प्रवास पूर्ण करेल. त्यामुळे दीड ते दोन तासांची बचत होणार आहे. या ट्रेनमुळे दोन्ही राज्यांतील पर्यटनाला चालना मिळेल, असा रेल्वेचा विश्वास आहे.



ही आहेत गाडीची वैशिष्ट्य: वंदे भारत ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे, ज्याचा कमाल वेग 160 किमी प्रतितास आहे. बहुतेक मार्गांवर ते 130 किमी प्रतितास वेगाने धावत आहे. या ट्रेनचे सर्व दरवाजे ऑटोमॅटिक आहेत, तसेच सीटही प्रवासानुसार खास करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ज्या काही वंदे भारत श्रेणीतील गाड्या धावत आहेत, त्यांना 16 डबे आहेत. मात्र, मडगाव ते मुंबई या गाडीला केवळ 8 डबे असणार आहेत. या ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना बुलेट ट्रेन आणि फ्लाइटची अनुभूती येणार आहे.



या स्थानकांवर थांबणार गाडी: रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. शुक्रवारी ही गाडी प्रवाशांच्या सेवेत नसेल. जर एखाद्या प्रवाशाला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर त्याला सीएसएमटी येथून पहाटे ५.२५ वाजता ही ट्रेन मिळेल, जी मडगाव, गोव्याला दुपारी १.१५ वाजता पोहोचेल. तर ही गाडी गोव्याहून दुपारी २.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. तसेच दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम स्थानकात थांबे असतील.

हेही वाचा -

  1. Vande Bharat Express गोव्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच धावणार मुंबईगोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस
  2. PM Modi In Hyderabad पंतप्रधान मोदींनी सिकंदराबाद तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा केसीआर यांची दांडी
  3. Vande Bharat Express वंदे भारत एक्स्प्रेस व्यावसायिक नोकरदारांना ठरणार फायदेशीर रेल्वे प्रवासी संघटनेचे निरीक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details