महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 8, 2022, 10:48 AM IST

Updated : Dec 8, 2022, 1:09 PM IST

ETV Bharat / state

Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात करणार समृद्धी, वंदेभारत आणि मेट्रोचे होणार लोकार्पण

Modi : 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

Modi
Modi

नागपूर:११ डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते बहुप्रतिक्षित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. याशिवाय देखील अनेक परियोजना आणि विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन ते करणार आहेत. यामध्ये मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उदघाटन, नागपूर ते बिलासपूर दरम्यान सुरू होत असलेल्या वंदेभारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यानंतर एम्स रुग्णालयाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर समृद्धीचे उद्घाटन करणार आहेत. या व्यतिरिक्त अनेक प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याने प्रशासन कामाला लागले आहे.

पंतप्रधान3 तासनागपूरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याची उत्सुकता वाढली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौऱ्याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी संभाव्य दौरा पुढे आला आहे. सुमारे 3 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरात थांबतील आणि अनेक प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. मिहानमधील एम्स जवळील प्रांगणात आयोजित मुख्य कार्यक्रम स्थळी येतील, तेथै त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी नागपुरात करणार लोकार्पण

असा असेल दौरा: 11 डिसेंबरला सकाळी 9:30 सुमारास नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते नागपूर रेल्वे स्थानकावर जातील. तेथे त्यांच्या हस्ते नागपूर- बिलासपूर वंदेभारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. याशिवाय ते रेल्वे स्थानक विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते झिरो माईल्स येथील मेट्रो स्थानकाला भेट देतील. तेथील फ्रीडम पार्कच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होईल. तसेच मेट्रोच्या 2 मार्गिकांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोने खापरीपर्यंत किंवा एअरपोर्ट स्थानकापर्यंत प्रवास करतील. तेथून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी रवाना होतील.

समृद्धी महामार्ग: मुंबई ते नागपूर द्रुतगतीमार्ग म्हणजेचं समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, ८ पदरी, १२० मीटर रुंदीचा महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला जोडणारा आहे. हा समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यातून २६ तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी ५६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी पर्यत पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी या महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत.

मेट्रोचे उद्घाटन:समृद्धी महामार्ग उदघाटना सोबतच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. मेट्रोचे काम पूर्ण होऊन 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक आणि सीताबर्डी ते पारडी या दोन मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 8, 2022, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details