मुंबई -गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी आज खऱ्या अर्थाने संपुष्टात आली. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री कोण हे चर्चेनंतर ठरवणार - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी आपण अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.
जनतेचा कौल कुणाच्या बाजूने लागला हे बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झाले आहे. लागलेला निकाल महायुतीला अपेक्षीत असलेल्या निकालापेक्षा बराच भिन्न होता. तरीही महायुतीची सत्ता स्थापन होणार हे मात्र नक्की आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.
महायुतीचा ठरलेला 50-50 फॉर्म्युला आमलात येईल अशी आशाअसल्याचे ते म्हणाले. तेव्हाच, मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा करून ठरवणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आदीत्य ठाकरे यांनी वरळीत मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले, वडील म्हणुन मला आदीत्यचा अभिमान आहे. आदीत्य यांना निवडून दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.