मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नेहमीच महाविकास आघाडीसोबत खटके उडत होते. अलीकडे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्याबद्दल जनतेत रोष निर्माण होत होता. राजीनाम्यासाठी त्यांच्या विरोधात विविध आंदोलने केली गेली. सर्वच स्तरांतून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. राज्यपाल पदावरून मुक्त करा, अशी विनंती भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली होती. त्यामुळे राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारी असल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत.
प्रसिद्धीपत्रक जाहीर केले :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात त्यांनी स्वतःहून दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ जानेवारी रोजी मुंबई दौरा झाला होता. या दौऱ्यानंतर राज्यपाल भवनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.