मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार की नाही याबाबत संशकता आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. षण्मुखानंद सभागृह येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. एकीकडे पक्ष आणि चिन्ह कोणाचा हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बाळासाहेबांची पहिली जयंती लक्षणीय ठरणार आहे.
तैलचित्र सोहळयाचे आमंत्रण : बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्वांना या सोहळयाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
राज्यभरातील कार्यकर्ते शिवाजी पार्कवर : आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहे. तर दुसरीकडे परभणीच्या पालम मधून रामचंद्र गायकवाड हे शिवसेना कार्यकर्ते सहा दिवसात 500 किलोमीटरचा सायकलवरु प्रवास करुन बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आले आहेत. शिवसेनेचे हे कार्यकर्ते दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कवर सायकलवर येत असतात. यंदाचे त्यांचे सातवे वर्ष आहे.