मुंबई- गणेश विसर्जन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनातर्फे चौपाट्यांवर अधिक सोई सुविधा देण्यात येत आहेत.
हेही वाचा -वांद्र्यात शिक्षणमंत्री शेलार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालयाचे लोकार्पण
अनंत चतुर्थी दिवशी मुंबई शहरात गणपती विसर्जनाच्या काळामध्ये 40 हजारांहून अधिक मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतील समुद्रकिनारी मुंबई पोलिसांकडून तटरक्षक दल, नौदल व महानगरपालिकेशी समन्वय साधून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
हेही वाचा - रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! राजधानी आठवड्यातून आता चार वेळा धावणार
गणपती विसर्जनाच्या गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह वेगवेगळ्या विसर्जनस्थळी एनसीसी स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबरच मुंबई शहरात 5 हजार सीसीटीव्हीच्या माध्यमातून घडामोडीवर लक्ष ठेवले जाणार आहे. गिरगाव चौपाटी येथून सुरक्षेचा आढावा घेतला आहे.