मुंबई -शहरात नाताळाची लगबग सुरू झाली आहे. सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. मॉल, दुकाने, बेकरी याठिकाणी लगबग दिसून येत आहे.
मुंबईत नाताळाची लगबग, बाजारपेठ सजली
येत्या 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस असल्याने ख्रिस्तीबांधव हा सण उत्साहात साजरा करतात. ख्रिस्ती बांधव आपले घर सजवतात. नवीन वस्तू विकत घेतात. केक बनवले जातात. येशुचा जन्म अधोरेखित करणारा देखावा साकारण्यात येतो. या सणाचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठ सजली आहे.

ट्रेनमध्ये, रस्त्यावर सांताक्लॉजच्या टोपीची चलती आहे. वेगवेगळे स्टार कंदील, सजावटीसाठी लागणारे तोरण, घराची शोभा वाढवणारी लाईटींग उपलब्ध आहे. सांताक्लॉजचे कपडे, खिसमस ट्रीने बाजारपेठ भरली आहे. भेट देण्यासाठी खास ख्रिसमस स्पेशल पेन, पेन्सिल बाजारात आले आहे. रुपये 10 ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.