मुंबई- शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिवसेनेने वांद्र्यातील बीकेसीमध्ये जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
वांद्र्यात शिवसेनेच्या जल्लोषाची जोरदार तयारी
या जल्लोषाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 11 शिवसैनिक यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले आहे. या कार्यक्रमात राज्यातील अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती राहणार असून त्यात प्रामुख्याने अवधूत गुप्ते, सोनाली कुलकर्णी, अजय गोगावले, अतुल गोगावले, नितीश भारती, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सुबोध भावे आदी कलावंत उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - मला आनंदच.. लोकांच्या समस्या लक्षात घेऊन अमित ठाकरेंनी काम करावे
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने वचनपूर्ती कशी केली, यासाठीची माहिती राज्यातील जनतेला मिळावी हा प्रमुख उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडून अशा प्रकारचा हा सर्वात मोठा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - तोतया आयपीएस अधिकाऱ्याला 70 लाखांची खंडणी घेताना अटक; पाच किलो सोनेही लंपास