मुंबई:मुंबईची लाईफ लाईन म्हणून रेल्वेच्या लोकलची ओळख आहे.मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मान्सूनपूर्व कामांना गती आली आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना लोकलने प्रवास करीत असताना कोणत्याही त्रासाला सामोरे जाता कामा नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे कडून मान्सूनपूर्व कामे प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे आघाडीवर:मुंबई शहर आणि उपनगरात लोकलची मान्सून पूर्व तयारी कामांमध्ये मध्य रेल्वेणे बाजी मारली आहे. जवळपास सर्वच कामे पूर्ण झाली झाली आहे. पश्चिम रेल्वेचे देखील 80 टक्के कामे पूर्ण झाली आहे. वेळ आधी कामे पूर्णत्वास घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या होत. पावसात ज्या ठिकाणी रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो अशा असुरक्षित ठिकाणी 24 लक्ष ठेवले जाणार आहे.
हाती घेतलेली कामे:पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे.पश्चिम आणि मध्य रेल्वेची सेवा पावसाळ्यात सुरळ, विनाव्यत्यय सुरु रहावी या पार्श्वभूमी वरती कामे सुरू आहे. गाळ काढणे, कल्व्हर्ट आणि नाले साफ करणे, झाडाची छाटणी करणे , खड्डे स्कॅन करणे, पाणी साचणारी असुरक्षित असलेल्या ठिकाणी उच्च वॅटेज पंपची व्यवस्था करणे, मल्टी- सेक्शन डिजिटल काउंटर तयारी केलीय. मुंबई शहर आणि उपनगरातील ट्रक 80% नाल्यांची साफसफाईचे काम झाले आहे. कल्व्हर्ट्स स्वच्छ केले जातं आहे. काही ठिकाणी झाडांची छाटणी आणि कापणी करण्याचे काम सुरु आहे.