मुंबई - पूर्व उपनगरातील काही भागात शुक्रवारी मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. शुक्रवारी दुपारपासून ढगाळ वातावरणासह जोरदार वाहत होते. पूर्व उपनगरातील भांडुप, मुलुंड पट्ट्यात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, या पावसाने आणखी गरमी वाढली आहे.
उपनगरात कोसळल्या मान्सून पूर्व पावसाच्या सरी; उकाडा वाढला - मुंबई मान्सून पूर्व पाऊस
पूर्व उपनगरातील काही भागात शुक्रवारी मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. पूर्व उपनगरातील भांडुप, मुलुंड पट्ट्यात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, या पावसाने आणखी गरमी वाढली आहे.
पाऊस
शुक्रवारी सांताक्रूझ वेधशाळेने कमाल 34.5, किमान 29.00 असे तापमान नोंदवले. आजही हेच तापमान कायम राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे. 30 आणि 31 मे ला आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच 31 मे ला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असेही सांगण्यात आले आहे.
Last Updated : May 30, 2020, 10:40 AM IST