महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रविण दरेकरांची शताब्दी रुग्णालयाला भेट, कोरोनोच्या स्थितीचा घेतला आढावा - शताब्दी रुग्णालयालय न्यूज

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. कोरोनाच्या कालावधीत प्रशासनाकडून रुग्णालयात करण्यात आलेल्या नियोजनाचा दरेकर यांनी आढावा घेतला.

Pravin Darekar visited Shatabdi Hospital in kandivali
प्रविण दरेकरांची शताब्दी रुग्णालयाला भेट

By

Published : May 13, 2020, 7:43 PM IST

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. कोरोनाच्या कालावधीत प्रशासनाकडून रुग्णालयात करण्यात आलेल्या नियोजनाचा दरेकर यांनी आढावा घेतला. रुग्णालयातील डॉक्टरांकडून तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच या रुग्णालायतील निवासी डॉक्टर्स संपावर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर दरेकर यांनी तत्काळ मुंबई महानगरपालिका आयुक्त चहल यांच्याशी संर्पक साधला. कोरोनासारख्या संकटकाळात डॉक्टर्सने संपावर जाऊ नये, असे आवाहनही दरेकर यांनी केले.


काल (मंगळवार) आंतराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित शताब्दी रुग्णालयात कोरोनासारख्या संकटकाळातही अहोरात्र सेवाभावी काम करणाऱ्या परिचारिकांचा सत्कार यावेळी दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या सेवेप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार भाई गिरकर, नगरसेविका प्रियांका मोरे, भगवती रुग्णालयाचे डॉ. गुप्ता परिचारिका वर्ग आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details