महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pravin Darekar On Sanjay Shirsat : देवेंद्र फडणवीस हे मदारी नाही तर कारभारी आहेत; संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे - प्रविण दरेकर यांचा खोचक सल्ला - प्रविण दरेकर आणि संजय शिरसाट

Pravin Darekar On Sanjay Shirsat : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी बोलताना आपल्या क्षमतेनुसारच बोलावे, देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी केंद्रात जावे की, महाराष्ट्रात राहावे हे सुचवण्याचा अधिकार शिरसाठ यांना नाही. त्यासाठी आमचे केंद्रीय नेतृत्व सक्षम आहे असे सांगत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिरसाठ यांना सुनावले आहे.

Pravin Darekar Reaction On  Sanjay Shirsat
प्रविण दरेकर आणि संजय शिरसाट

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 10:49 PM IST

माहिती देताना प्रविण दरेकर

मुंबईPravin Darekar On Sanjay Shirsat : मुख्यमंत्री पदाची चर्चा महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोर धरू लागल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी वक्तव्य समोर येऊ लागली आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा आहे असे म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्रात नेतृत्व करावे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहावं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेचा भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.



शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत राहावे: या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रविण दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहण्याची केंद्रात जावे हे सुचवण्याचा अधिकार शिरसाट यांना नाही. शिरसाट यांनी आपल्या क्षमते प्रमाणे बोलावे, ते केवळ आपल्या सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत म्हणून आपण क्षमता हा शब्द वापरतो आहे औकात हा नाही, असेही यावेळी दरेकर यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातच राहावं ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नेतृत्व करावं आणि महाराष्ट्राला विकासाकडे न्यावे, अशी जनतेची इच्छा असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.



राऊत हे स्वतःच माकड : शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मदारी हा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मदारी नाही तर कारभारी आहेत. त्यांनी अतिशय समर्थपणे आणि यशस्वीपणे महाराष्ट्राचा कारभार पाच वर्ष चालवला आहे. आताही उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राचे कारभारी आहेत. सामनामध्ये नोकरी करून आपण कोणाच्या तालावर नाचता हे सर्वांना माहीत आहे. कदाचित आपण स्वतःचा आणि आपल्या युवा नेत्याचा उल्लेख माकड म्हणून करीत असाल आणि आपल्या नेत्याला मदारी म्हणत असाल तर त्यात वावगे नाही असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.

हेही वाचा -

  1. Sanjay Shirsat On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्रात राज्याचं नेतृत्व करावं - संजय शिरसाटांनी लावली कळ
  2. Pravin Darekar Reaction : मध्यप्रदेशात पुन्हा मारणार भाजपाच बाजी, प्रवीण दरेकरांनी दौऱ्यावरुन आल्यावर व्यक्त केला विश्वास
  3. Pravin Darekar : उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला लागलेला...; प्रवीण दरेकरांचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details