मुंबई -एक आक्रमक नेता म्हणून प्रवीण दरेकर यांची ओळख आहे. दरेकर सध्या मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1968 साली झाला असून लहानपणापासून त्यांनी समाजकार्यात रस घेतला. आता त्यांची विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांना विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाल्याची चर्चा आहे.
प्रवीण दरेकरांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड ; 'असा' आहे त्यांचा राजकीय प्रवास - प्रवीण दरेकरांचा राजकीय प्रवास
मनसेमधील काही नेत्यांच्या मनमानीला कंटाळून मनसे पक्षाच्या प्राथमिक सद्स्यत्वाचा प्रवीण दरेकर यांनी राजीनामा दिला. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2016 ला विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. आता ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही पक्षात ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिल्याचे बोलले जात आहे.
दरेकर यांनी विद्यार्थी दशेत देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली होती. ते शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेत कार्यरत होते. त्याचबरोबर त्यांनी सहकार क्षेत्रात ही आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात काम सुरू केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 2006 साली स्थापन झालेल्या मनसेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. तसेच त्यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, त्यांना 2014 च्या विधानसभेत विजय मिळवता आला नाही. मनसेमधील काही नेत्यांच्या मनमानीला कंटाळून मनसे पक्षाच्या प्राथमिक सद्स्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2016 ला विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. आता ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकट वर्तीय म्हणूनही पक्षात ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिल्याचे बोलले जात आहे.