महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने आपली मूळ भूमिका बदलत गुंडाराज सुरू केलंय - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर शिवसेना टीका

काल निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणातील आरोपींना अटक होऊन लगेच जामीनही मिळाला आहे. या प्रकारावरून विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

Pravin Darekar
प्रवीण दरेकर

By

Published : Sep 12, 2020, 3:18 PM IST

मुंबई - निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणार्‍यांना लगेच जामीन कसा मिळतो? शिवसेनेने आपली मूळ भूमिका बदलत गुंडाराज सुरू केले आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. कांदिवली पूर्व येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना काल शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. आज रूग्णालयात जाऊन विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शर्मा यांची भेट घेतली.

शिवसेनेने गुंडाराज सुरू केलंय

राज्याचे दुर्दैव आहे, ज्यांनी हल्ला केला त्यांना तत्काळ जामीन मिळाले. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी तत्काळ पोलीस पोहचले मात्र, ज्यांना मारहाण केली त्यांनाच अटक करण्यासाठी. राज्यात अशाच प्रकारचे गुंडा राज सुरू आहे. खुलेआम कायदा पायदळी तुडवत शर्मा यांना मारहाण केली गेली.

निवृत्त नौदल आधिकाऱयांचे देशासाठी वेगळे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सैनिकांचा सन्मान केला. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सैनिकांचा गौरव केला. मात्र, आता सत्तेच्या नादात शिवसेना आपली मूळ भूमिका विसरत आहे. क्षणोक्षणी त्यांचे गुंडाराज त्या दिसत आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. शर्मा यांचा डोळा फुटला. अतुल भातखळकर यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिल्यानंतरही लवकर कारवाई झाली नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

ज्या प्रकारे महाराष्ट्रात राज्य सरकारचा कारभार सुरू आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांसोबत या प्रकरणाविषयी बोलणे झाले आहे. गरज पडली तर आयुक्तांकडेही जाऊ. सर्व गुन्हेगारांवर आवश्यक ती कलमे लावून कारवाई करा. हे खरोखर जनतेचे राज्य असेल तर या गुन्हेगारांना कसल्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये, असे दरेकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details