महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pravin Darekar : उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला लागलेला...; प्रवीण दरेकरांचा घणाघात - देवेंद्र फडणवीस नागपूर कलंक

नागपूरच्या दौऱ्यात शिवसेना ठाकरे (Pravin Darekar on Uddhav Thackeray) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक (Devendra Fadnavis Kalank Remark) आहेत, असे संबोधले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिहल्ला केला जात आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेले कलंक आहेत, असे म्हटले आहे.

pravin darekar
प्रवीण दरेकर

By

Published : Jul 11, 2023, 5:40 PM IST

मुंबई - सोमवारी याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही (Pravin Darekar on Uddhav Thackeray) कलंकित कोण? असा उपप्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी व्यक्त (Devendra Fadnavis Kalank Remark) केली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मागच्या दाराने मुख्यमंत्री -याविषयी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे नागपूरचे भाषण म्हणजे राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे भाषण होते. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे घराण्याला, ठाकरे नावाला, महाराष्ट्रातील मराठी माणसालासुद्धा लागलेला कलंक आहात. मुंबईत गेली २५ वर्ष सत्ता असूनही तुम्ही मुंबई बकाल केलीत. कोविडमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची कॅगमार्फत चौकशी सुरू आहे. दरेकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे त्यांच्या दौऱ्यात कुठेच विकासाची भाषा करत नाहीत. नामर्द अशा प्रकारची पोरकट वक्तव्ये करताना ते दिसतात. उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री व्हायचे माझे स्वप्न नव्हते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न होते. पण तुम्ही शरद पवारांच्या मागच्या दाराने जाऊन मुख्यमंत्री झालात.

बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. स्वतःचे घरं भरण्याचे कामं केलंत. महापालिकेच्या जीवावर फक्त आपलेच घर भरण्याचे कामं तुम्ही केले. घरपण काय असते हे उद्धव ठाकरे यांना माहित नाही - प्रवीण दरेकर, भाजप आमदार

चुली विझवण्याचे कामं केले - तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होता. तेव्हा बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य दिसले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. विदर्भात तुमचे आमदार, खासदार किती याचे आत्मपरीक्षण करा. २०१४ साली तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलात ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असे प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले. बाळासाहेबांनी अनेकांच्या चुली पेटवल्या. मात्र तुमच्या नेतृत्वात चुली विझवण्याचे कामं झाले. जनतेची राखरांगोळी झाली. उद्धव ठाकरे तुम्ही जुन्या नेत्यांना संपवण्याचे कामं केलंत. आता जुन्या शिवसैनिकांना गोंजारण्याचे काम तुम्ही करताय हे फार दुर्दैवी आहे. बाळासाहेबांनी कष्ट करून मोठ्या केलेल्या शिवसेनेला संपवण्याचे काम उद्धव ठाकरे तुम्ही करत आहात, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी - पुढे प्रवीण दरेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी तुमचे अडीच वर्षाचे पार्सल घालवण्याचे काम केले आहे. आमचे 'मोदी@9' अभियान हे चर्चेसाठीच आहे. यात विकासाच्या योजना आम्ही लोकांसमोर मांडत आहोत. आमच्या अभियानात सहभागी झाला असतात तर बरे झाले असते. मी शिवसेनेच्या संस्कृतीतून आलो आहे. शाखेत झाडू मारणारा शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवला. वक्ते तुमच्याकडेही खूप होते. म्हणून राज ठाकरे, नारायण राणे, रामदास कदम, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते बाहेर काढलात. बाळासाहेब म्हणाले होते जेव्हा कधी काँग्रेससोबत जायची वेळ येईल त्यावेळेस मी दुकान बंद करेन. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. तुमचे ढोंगीपण जनतेला दिसून येत आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना आमच्या देवदैवतांना कडीकुलपात बंद करून ठेवले होतात. उद्धव ठाकरे तुम्ही निष्ठावंतांना, घरातल्या नातेवाईकांना बाहेर काढलात. उद्धव ठाकरेंकडे लाचार, दलालांची फौज आहे. निष्ठावंतांची, खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे. असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis Kalank Remark : 'उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले, त्यांना....'
  2. Devendra Ek Abhiman : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचे नागपुरात संतप्त पडसाद, भाजप विरुद्ध शिवसेनेत रंगले ट्विटर 'वार'
  3. Uddhav Thackeray : 'मी फक्त जाणीव करून दिली, शिव्या दिल्या नाही', फडणवीसांवरील वक्तव्यावर उध्दव ठाकरेंचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details