मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे चित्र आहे. पालिका आयुक्तांची बदली झाल्याने ते अधिक स्पष्ट झाले. आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली केली आहे. अजय मेहता व प्रवीण परेदशी यांच्यामधील युध्दाचा अंत झाला आहे की, मध्यंतर झाला आहे, याची मला कल्पना नाही. पण, या निमित्ताने प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे, असा निशाणा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर साधला.
जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली.. दरेकरांचा सरकारवर निशाणा - pravin pardeshi transfer
पालिका व सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. आपत्तीजनक परिस्थितीत सरकारी अधिकीऱ्यांची बदली करण्याची परंपरा नाही.
हेही वाचा-'येथील प्रत्येक नागरिक जवान, शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही'
पालिका व सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. आपत्तीजनक परिस्थितीत सरकारी अधिकीऱ्यांची बदली करण्याची परंपरा नाही. कोरोनोच्या परिस्थितीत मंत्रालय व महापालिका आयुक्त स्तरावर घेतलेल्या निर्णयामुळे मतभेद निर्माण झाले. त्यामुळे कोरोनाच्या संकटमय परिस्थितीत सरकार व प्रशासन यामधील अंतर्गत विसंवाद उघड झाला असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.