महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारचा पर्दाफाश करणार' - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर न्यूज

जनतेला न्याय मिळवूण देण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारचा पर्दाफाश करणार असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

pravin darekar criticism on maha vikas aghadi
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

By

Published : Feb 24, 2020, 5:23 PM IST

मुंबई - राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही सरकारवर निशाणा साधला. राज्यात बळीराजाची अवस्था बिकट झालेली आहे. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, असे असताना शेतकऱ्यांना न्याय देण्यास आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारचा पर्दाफाश करणार असल्याचे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले.

हेही वाचा - 'कर्जमाफीवरुन विरोधक आक्रमक, स्थगन प्रस्ताव विधानपरिषदेत मांडणार'

हेही वाचा - नमस्ते ट्रम्प...! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर, अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

प्रविण दरेकर यांची सरकारवर टीका

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दरेकर आणि भाजपच्या इतर सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारचा जाहीर निषेध दर्शिवला. आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास व त्यांच्या विविध हक्कांसाठी लढण्यास असमर्थ ठरले आहे. राज्यात महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्यातील महिला असुरक्षीत असल्याचे दरेकर म्हणाले. महिलांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details