महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाणार रिफायनरी प्रकल्प: 'शिवसेनेची भूमिका सकारात्मक असेल तर स्वागत' - Pravin Darekar comment on Nanar Refinery Project

राजकारण करताना अशा अनेक मुद्यांवर काही विभिन्न भूमिका घ्याव्या लागतात. मात्र, आता कोकणच्या विकासासाठी रिफायनरी बाबत सेनेची भूमिका मवाळ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

pravin-darekar
pravin-darekar

By

Published : Feb 15, 2020, 5:02 PM IST

मुंबई- महायुतीचे सरकार असताना कोकणातील प्रस्तावित 'नाणार रिफायनरी'ला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. मात्र, आता महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये नाणार विषयी शिवसेनेची भूमिका सकारात्मक दिसत आहे.तसे असेल तर आम्ही शिवसेनाच्या निर्णयाचेस्वागत करत असल्याचे भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर...

हेही वाचा-उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान..! ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार, सोशल मीडियावर 'त्या'ची चर्चा

शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रात ठळक मथळ्यात नाणार संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे नाणार संदर्भातील हे सकारात्मक दिशेने चाललेले वातावरण आहे की काय? असे आम्हाला वाटते, असेही दरेकर यांनी सांगितले. भाजपच्या अधिवेशना दरम्यान ते माध्यमांशी ते बोतल होते.

कोकणच्या विकासासाठी पर्यावरणाशी तडजोड न करता महायुती शासनाच्या काळात नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र, शिवसेनेने तेव्हा या भूमिकेला कडाडून विरोध केला होता. राजकारण करताना अशा अनेक मुद्यांवर काही विभिन्न भूमिका घ्याव्या लागतात. मात्र, आता कोकणच्या विकासासाठी रिफायनरी बाबत सेनेची भूमिका मवाळ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


ABOUT THE AUTHOR

...view details