प्रशांत म्हात्रे यांची प्रतिक्रिया मुंबई :वारकरी महिनाभर पायी चालत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला पहाटे आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन झाले की, वारकरी मंडळी धन्य होतात. मात्र, मुंबईतील काही चाकरमानी, नोकरदार वर्गाला नोकरी, धंद्यामुळे पंढरपूरला जायला जमत नाही. त्यामुळे असे वारकारी वडाळा गावातीलच विठ्ठलाचे दर्शन घेऊन धन्य होतात. म्हणूनच वडाळ्यातील विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर असे नाव पडले आहे. लाखो भाविक आषाढी एकादशी दिवशी आपल्या लाडक्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील या श्री. विठोबा महादेव गणपती मंदिरात आवर्जून येतात.
विठ्ठलाचे मंदिर 406 वर्ष जुने :वडाळ्यातील विठ्ठलाचे हे मंदिर ४०६ वर्षे जुने असून संत तुकाराम महाराजांनी या मंदिराची स्थापना केल्याचे सांगितले जाते. र्वी मुंबई ही सात बेटांची होती आणि वडाळा गाव हे मिठागर होते. वडाळा गावात मिठागर असल्याने संत तुकाराम महाराज खरेदीसाठी येत होते. ते वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसत. तेथेच त्यांनी जवळपास शके 1600 मध्ये या विठ्ठल मंदिराची स्थापना केली.
संत तुकाराम महाराजांच्या हस्ते स्थापना : श्री विठोबा महादेव गणपती ट्रस्टचे सचिव प्रशांत म्हात्रे यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, या मंदिराला संत तुकाराम महाराजांच्या सहवासाचा लाभ झाला असून या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती आपोआप प्रकट झाली आहे. मुंबईहून पंढरपूरकडे निघालेल्या यात्रेकरूला पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या पात्रात काळा पाशान पायाला लागला. वाररकाऱ्यांने पाहिल्यानंतर त्यांचा आकार विठ्ठलासारखा दिसू लागला. त्यानंतर वारकऱ्यांने ती मुर्ती वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आणली. त्यानंतर या मूर्तीची स्थापना संत तुकाराम महाराजांनी 1617 मध्ये केली होती.
पुढे प्रशांत म्हात्रे म्हणाले की, हे वडाळा गावाचे मंदिर आहे. जेव्हा मुंबई सात बेटे होती, त्यावेळी वडाळा हे गाव होते. या मंदिराच्या स्थापनेला 406 वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी वडाळ्यात मिठागार होते. त्यामुळे खरेदी करण्यासाठी संत तुकाराम महाराज वडाळा गाव येथे येत. मग ते एका वटवृक्षाखाली थांबायचे. त्यावेळी येथे मंदिराची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. याचा कोणताही पुरावा नसल्यामुळे आपण याला आख्यायिका म्हणू, तेव्हापासून येथे हा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी कौलारू मंदिर होते, आता ते बांधलेले मंदिर आहे. कौलारू मंदिराचे पूर्वीचे फोटो आमच्याकडे आहेत. 1962 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तेव्हापासून हा उत्सव जोरात सुरू आहे.
1962 मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार :पुढे प्रशांत म्हात्रे यांनी सांगितले की, वडाळा गावाचं मंदिर आहे. जेव्हा मुंबई सात बेटांची होती. त्यावेळेस वडाळा आहे एक गाव होतं. त्यावेळेस हे मंदिर आहे त्या मंदिराला प्रतिष्ठापना करून 406 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पूर्वी वडाळा हे एक मिठागर होतं. त्यामुळे खरेदी करण्यासाठी संत तुकाराम महाराज वडाळा गाव येथे येत. तेव्हा ते वडाच्या झाडाखाली थांबायचे.त्यावेळी इकडे मंदिराची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. आपण आख्यायिका म्हणू कारण त्याविषयी पुरावा नसल्यामुळे आणि तेव्हापासून इकडे उत्सव साजरा होतो आहे. पूर्वी कौलारू मंदिर होतं आता बांधकाम केलेले मंदिर आहे. पूर्वीचे कौलारू मंदिराचे फोटो आमच्याकडे आहेत. 1962 मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. तेव्हापासून उत्सव जोरदार चालतोय. लाखो विठ्ठलाचे भाविक येथे दर्शनासाठी आषाढी एकादशीला येतात. लोकं दिंड्या घेऊन येतात. मुंबईमध्ये गिरण्या होत्या.
एकादशीला पहाटे चार वाजता अभिषेक :गिरणी कामगारांना पूर्वी पंढरपूरला जाण्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे ते दिंड्या घेऊन वडाळ्याला यायचे. जशा जशा गिरण्या बंद झाल्या, तशा तशा दिंड्याचे प्रमाण कमी झाले. उपनगरातील जोगेश्वरी वगैरे या भागातून दिंड्या येतात. श्री विठोबा महादेव गणपती मंदिर ट्रस्टकडे सर्व उत्सवाची जबाबदारी असते. आषाढी एकादशीची दशमीपासून सुरुवात होते. दशमीपासून कार्यक्रम सुरू होतात. दशमीला अभिषेक झाला की यात्रा सुरू होते. पूर्वी गाव देऊळ म्हणजे गावाची यात्रा होत असे. सकाळी दहा वाजता अभिषेक झालेला आहे, आता यात्रा चालू. एकादशीला पहाटे चार वाजता अभिषेक होतो. त्यानंतर सतत भाविकांसाठी दर्शन सुरू असते. ते दर्शन रात्री एक वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती श्री विठोबा महादेव गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव प्रशांत म्हात्रे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा -Eknath Shinde Pandharpur Visit : केसीआर यांच्या दौऱ्याआधीच मुख्यमंत्री पंढरपुरात; कामात कमतरता राहिल्यास अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा