मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील निकाल आज जो जाहीर केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुली आणि मुलं उमेदवारांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. राज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रतीक प्रतिसाद आगवणे हा प्रथम आला तर महिलांमधून अक्षता दत्तात्रय मांजरे हिनेदेखील पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या संदर्भात छात्रभरती विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रोहित ढाले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की "अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय आणि महिला यांना जर उच्च शिक्षणाची संधी मिळाली तर त्या संधीचे सोने कसे करतात याचा उदाहरण म्हणून हा निकाल पाहता येईल."
405 पदांकरिता उमेदवारांची शिफारस :महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 405 पदांकरिता अनेक उमेदवारांची शिफारस केलेली आहे. पण त्यातून जे प्रथम आलेले आहेत. त्या संदर्भातील नावे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेले आहेत. संपूर्ण निकाल हा त्यांच्या संकेतस्थळावर देखील त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. निकाल जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यांना तो पाहता येईल.