मुंबई:ठाण्यातल्या पोखरण रोड क्रमांक 1 येथे उभारलेले छाबय्या विहंग गार्डन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. कारण ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. आता राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दंड माफ केला. सरनाईक यांच्या कंपनीचा दंड माफ प्रकरणावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने विरोध केला होता. तरीही राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे या विरोधात आज ठाण्यात भाजपने विरोध केला होता.
प्रताप सरनाईक यांची गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता धडक कारवाई करत ठाण्यातील 02 फ्लॅट आणि जमीन जप्त केली आहे, एनएसईएल घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग 2002 च्या तरतुदींनुसार 11.35 कोटी रुपये मुल्य आहे. ईडीने 2013 च्या गुन्ह्याच्या आधारे 30.09.2013 रोजी आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी याप्रकरणात त्यांचे संचालक आणि प्रमुख अधिकारी तसेच 25 डिफॉल्टर आणि इतरांवर मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात, आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करत गुन्हेगारी कट रचला, त्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे व बनावट खाती तयार केली. या प्रकरणात विश्वासार्हतेचा भंग केला.
पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले की विविध गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे कर्जदार एनएसईएलच्या व्यापारी सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक थकीत कर्जाची परतफेड आणि इतर ठिकाणी वळवले होते. तपासात पुढे असे दिसून आले की डिफॉल्टर सदस्यांपैकी एक असलेल्या आस्था ग्रुपचे 242.66 कोटी रुपये कंपनीकडे आहेत. 2012-13 च्या कालावधीत मेसर्स विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प एलएलपीचे 21.74 कोटी एकूण रक्कमेपैकी रु. 21.74 कोटी मेसर्स विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प LLP कडून प्राप्त झाले. रुपये 11.35 कोटी मेसर्स विहंग एंटरप्रायझेस आणि मेसर्स विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड, दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली आहेत.