आमदार प्रकाश सूर्वे यांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अनोख्यापद्धतीने केला साजरा मुंबई: मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज येथे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना केक भरवले. तसेच कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस निमित्ताने 15 दिवसाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
स्वच्छता मोहिमेचे आयोजन: आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथे बीएमसी स्वच्छता कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने कांदिवली पूर्व येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश सुर्वे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे नेते, गरिबांचे मुख्यमंत्री, सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस सफाई कर्मचाऱ्यांसोबत केक कापून साजरा करण्यात आला.
समुद्राच्या पलीकडेही वाढदिवस साजरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होणार आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि महाविकास आघाडी कोसळल्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात तसेच देशात एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, त्यांचे चाहते राज्यात आणि देशातच नाही तर परदेशातही आहेत. असाच अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आला. ९ फेब्रुवारी हा मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्याच्या एक दिवस आधी समुद्राच्या पलीकडे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये काही तरुणांनी एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावून वाढदिवस साजरा केला. ही छायाचित्रे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
शुभेच्छा देणारे बॅनर प्रदर्शित:एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अल्पावधीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसांच्या हृदयात एकनाथ शिंदे यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करण्याचे ठरवले. एवढेच नाही तर या तरुणांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर बनवून टाइम्स स्क्वेअर आणि ग्रँड सेंट्रलमध्ये प्रदर्शित केले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खास भेटवस्तू देण्यासाठी हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे तरुणांनी सांगितले.
हेही वाचा: Eknath Shinde Birthday मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस थेट न्यूयॉर्कमध्येही साजरा