मुंबई- भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरून राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर आपण भाजप पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने सगळ्याच चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचे खच्चीकरण केले जाते, असा आरोप केला आहे.
'ओबीसी असल्याने भाजपकडून पंकजा मुंडेंचे खच्चीकरण' - ओबीसी समाजाच्या नेत्यांचे खच्चीकरण
पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचे खच्चीकरण केले जाते, असा आरोप केला आहे.
!['ओबीसी असल्याने भाजपकडून पंकजा मुंडेंचे खच्चीकरण' पंकजा मुंडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5267310-311-5267310-1575461322601.jpg)
हेही वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तैनात
भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही माजी आमदार शेंडगे यांनी केला आहे. भाजपमध्ये आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे व आता पंकजा मुंडे यांनाही डावलण्यात आले आहे. मी स्वतः भाजपमध्ये नेता होतो. बहुजन समाजातील नेत्यांचा निवडणुकीपुरता वापर करायचा आणि त्यांना नंतर खड्यासारखं बाजूला ठेवले जाते. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी यांपासून सावध राहिल पाहिजे, असा सल्लाही शेंडगेंनी दिला आहे.