मुंबई- देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना घरातच राहावे लागणार आहे. घरात राहून आळशीपणा, नैराश्य येत आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे, लॉकडाऊनच्या दिवसात रोज ३० मिनिटे एक्सरसाईज केल्यास आपले आरोग्य उत्तम राहू शकते तसेच मूडही फ्रेश राहतो. याबाबत प्रकाश सावंत यांनी युवकांना फिटनेस मंत्र दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये घर बसल्या मिळवा उत्तम आरोग्य, प्रकाश सावंत यांचा फिटनेस मंत्र - लॉकडाऊनमध्ये घर बसल्या मिळवा उत्तम आरोग्य
घरी बसून व्यायामाची कोणतीही साधने नसताना उपलब्ध वस्तूंच्या आधारे आपण एक्सरसाईज करू शकतो, अशा टिप्स फिटनेस ट्रेनर प्रकाश सावंत यांनी दिल्या आहेत. जीममध्ये जावून आपण एक्सरसाईज करण्यासाठी वजन उचलतो. आता जीम बंद असल्याने घरी उपलब्ध असलेल्या बादलीमध्ये गरजेनुसार पाणी घ्यावे. ही वजन असलेली बादली उचलून पाठीचा, पायाचा, आर्म्स, शोल्डर प्रेस, विंगस असे सोपे प्रकार करून घरीच एक्सरसाईज करावा.
![लॉकडाऊनमध्ये घर बसल्या मिळवा उत्तम आरोग्य, प्रकाश सावंत यांचा फिटनेस मंत्र लॉकडाऊनमध्ये घर बसल्या मिळवा उत्तम आरोग्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6854914-493-6854914-1587289222761.jpg)
घरी बसून व्यायामाची कोणतीही साधने नसताना उपलब्ध वस्तूंच्या आधारे आपण एक्सरसाईज करू शकतो, अशा टिप्स फिटनेस ट्रेनर प्रकाश सावंत यांनी दिल्या आहेत. जीममध्ये जावून आपण एक्सरसाईज करण्यासाठी वजन उचलतो. आता जीम बंद असल्याने घरी उपलब्ध असलेल्या बादलीमध्ये गरजेनुसार पाणी घ्यावे. ही वजन असलेली बादली उचलून पाठीचा, पायाचा, आर्म्स, शोल्डर प्रेस, विंगस असे सोपे प्रकार करून घरीच एक्सरसाईज करावा.
घरी करता येण्यासारखे काही एक्सरसाईजचे प्रकार असलेला व्हिडिओ बनविण्यात आला आहे. हे सर्व एक्सरसाईज तुम्ही प्रकाश सावंत यांच्या इनस्टाग्रामवर पाहून घरी करू शकता, असे प्रकाश यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकार आणि पालिका प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी सर्वांनी घरीच राहून एरोबीक्स, जमिनीवरचे व्यायाम प्रकार, मान-हात-बोटे यांचे साधे प्रकार जरी केले तरी आरोग्य उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल. लॉकडाऊनमुळे घरी बसून एक्सरसाईज करता यावी, यासाठी कॉलेजच्या तरुणांनी फिटनेस मंत्र देण्यात यावा अशी विनंती केली. त्यानुसार त्यांच्याकरिता खास घरी बसून शिकता येईल, असा ऑनलाइन 30 मिनिटांचा लाईव्ह प्रोग्राम बनविण्यात आल्याचे प्रकाश यांनी सांगितले.