महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेससोबत आघाडी नाही; वंचित स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांचा निर्णय - एमआयएम

गणपती उत्सवाच्या नंतर वंचितची राज्यभरातील यादीही जाहीर केली जाणार असून एमआयएमसोबत आमची आघाडी कायम असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी दादर येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर

By

Published : Sep 9, 2019, 7:37 PM IST

मुंबई- काँग्रेसने आम्हाला मागील काही दिवसात आघाडी करण्यासाठी खेळवत ठेवले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत आता काँग्रेससाठी आमचे दरवाजे बंद झाले असल्याचे सांगून वंचित बहुजन आघाडी स्वतंत्ररीत्या लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर

हेही वाचा -ओवैसी माझे 'गॉडफादर'; युतीच्या चर्चेसाठी आजही तयार - इम्तियाज जलील

गणपती उत्सवाच्या नंतर वंचितची राज्यभरातील यादीही जाहीर केली जाणार असून एमआयएमसोबत आमची आघाडी कायम असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी दादर येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्यासोबत जे-जे वंचित घटक अथवा इतर पक्षातील लोक येतील त्या सगळ्यांना सोबत घेणार आहोत. लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आम्ही प्रतिनिधित्व दिले होते. त्याचप्रमाणे विधानसभेचे आम्ही विविध समाजाला प्रतिनिधित्व देणार असल्याचेही आंबेडकर यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे काँग्रेसवर अनेक आरोप करत आता काँग्रेससोबतचे आमचे दरवाजे बंद झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे काँग्रेससोबत आमची कोणतीही चर्चा होणार नाही, तर एमआयएम सोबत मात्र आमची युती कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -एमआयएमसोबत आमची युती कायम - अॅड. प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत आघाडी करायचा नाही, असा निर्णय आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या समितीने घेतला असून त्याची माहिती आपल्याला देत असल्याचे ते म्हणाले.

आम्ही लोकसभेत काँग्रेसबरोबर युती म्हणून प्रयत्न केले असता, ते आम्हाला खेळवत राहिले. युती त्यांनी टाळली त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढून ताकत दाखवली. आमची आता काँग्रेससोबत बैठक झाली आणि व्यक्तिगतही बैठक झाली. आम्ही त्यांना प्रस्ताव दिला पण त्याचे उत्तर अजून आले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आता आघाडी करणार नसल्याचे जाहीर करत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

राज्यात विधानसभा निवडणुकीत आता आमची काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा नाही, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहोत. आमचा या विधासभेत फूटबॉल होऊ नये, म्हणून आम्ही युती करणार नाही. आम्ही आता उमेदवारांची यादी जाहीर करू. वेळ कमी आहे, 27 ऑक्टोबरला दिवाळी आहे, असे आम्ही मानतो. आम्हाला प्रचाराला वेळ हवा, असल्याचेही त्यांनी संगितले.

राज्यात गडचिरोली पाण्याखाली आहे, अहेरीपर्यंत पाणी आहे. सांगली, साताऱ्यात जसे दुर्लक्ष केले. तसेच तिकडेही शासन दुर्लक्ष शासन करतेय, असा आरोपही आंबेडकरांनी केला.

ईव्हीएमवर न्यायालयात सुनावणीची मागणी -

मला हॅकर्सनी एक चांगली बातमी दिली आहे. सर्व हकर्सनी निर्णय घेतला की, जर निवडणुकीत कोणी हॅकिंग करणार असेल तर त्यालाच आम्ही हॅक करू. तर एक हॅकरने मला न्यायालयात मशीन कसे हॅक केले ते दाखवू शकतो, असे सांगितले आहे. त्यावर आम्ही आता न्यायालयात सुनावणीसाठी मागणी करणार आहोत. प्रात्याक्षिकावेळी न वापलेली कोणतीही मशीन द्या, ती आम्ही हॅक करून दाखवू, असेही हॅकर्सने सांगितल्याचा खळबळजनक दावा आंबेडकर यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details