मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत येत्या एक-दोन दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला होता. याला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर ठेवणे आवश्यक आहे. सरकारला विनंती आहे की लॉकडाऊन करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी यांनी दिला आहे. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही, शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचे आहे. सरकारला आमची विनंती आहे की, लॉकडाऊन करू नये असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील करोना परिस्थितीची जाणीव करून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना करोना नियमावलीबाबत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाबद्दल कल्पना देत परिस्थिती कायम राहिली, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.