मुंबईPrakash Ambedkar on Lok Sabha Elections : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवणार अशी घोषणा पत्रकार परिषदेत केलीय. 1 सप्टेंबर 23 ला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आम्ही पत्र लिहिलं होतं की, अनेक काँग्रेस पक्षांच्या नेत्यांकडून वक्तव्य येतंय की आमच्याकडे अजून वंचितचा प्रस्ताव आलेला नाही. म्हणून त्या दृष्टीनं पत्र लिहिलं होतं. ते काँग्रेस पक्षाच्या वेबसाईटवरती सुद्धा पोस्ट करण्यात आलं. त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की, आम्हाला इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हायचं आहे. सहभागी होण्यासाठी ज्या काही आपल्या अटी असतील, त्यांवर आम्हाला आपल्याशी बोलायचं आहे. परंतु, आजपर्यंत या पत्राला कुठेही उत्तर किंवा रिप्लाय आलेला नाही, अशी परिस्थिती आहे. ज्यांना अधिकार नाहीत किंवा ज्यांना काँग्रेस पक्षांमध्ये गांभीर्यानं घेतल्या जात नाही, अशाच नेत्यांकडून वक्तव्य त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून येतं, असा आरोप वंचितचे नेते अँड प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
शिवसेनेशी युती मात्र ४८ जागांची तयारी :दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुका कधीही होवू शकतील, अशी परिस्थिती आहे. शिवसेनेबरोबरची युती आमची कायम आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमधला सीट वाटप करण्याचा फॉर्मुला अजून ठरत नाही किंवा ठरेल याची माहिती नाहीये. शिवसेनेपर्यंत आम्ही हा मेसेज पोहचवलेला आहे. कोणाचीच युती कोणाशी होणार नाही, असं गृहीत धरून आम्ही महाराष्ट्राच्या 48 जागेंच्या लोकसभेच्या तयारीला आम्ही लागलेलो आहे.