मुंबई - येत्या 26 डिसेंबरला कॅब आणि एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे दादर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेत करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, अशी माहिती वंबआ अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आज (मंगळवारी) मातोश्रीवर प्रकाश आंबेडकर आणि शिक्षक भारतीचे विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
#CAA Protest: आंदोलन शांततेत करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन - प्रकाश आंबेडकर
आज (मंगळवारी) मातोश्रीवर प्रकाश आंबेडकर आणि शिक्षक भारतीचे विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली यांनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले, जो प्रचार भाजप आरएसएस करत आहे तो पूर्णपणे खोटा आहे. त्यात मुस्लिम समाज भरडला जाणार यात काही शंकाच नाही. मात्र, हिंदू समाज सुद्धा भरडला जाईल. आजही बऱ्याच लोकांकडे जन्म दाखले नाहीत. मग हा कायदा लागू झाल्यावर त्यानी काय करायचे? हे आम्ही मुख्यमंत्री यांना सांगितले. तसेच भीमा कोरेगाव बाबत माझ्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्री यांनी मागितली आहे. पुढच्या बैठकीत मी त्यांना माझ्याकडे असलेली माहिती देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा -24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंंदाज