महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांत घोळ; 40 लाख बोगस मतदारांची नोंदणी - प्रकाश आंबेडकर

राज्याच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असून चाळीस लाखांच्यावर बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

By

Published : Oct 6, 2019, 6:37 PM IST

Updated : Oct 6, 2019, 7:44 PM IST

प्रकाश आंबेडकर

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे. यात चाळीस लाखांच्यावर बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या याद्या दुरूस्त होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने विधानसभेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

याबाबत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे घोळ झाला आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच याबाबत वंचितच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना सोडून इतर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन बोगस मतदार या याद्या दुरूस्त होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहनही आंबेडकरांनी यावेळी केले.

मतदारांच्या प्रत्येक ओळख पत्रावर एक ईपीक ( Electoral Photo Identity Cards) नंबर असतो. हा नंबर युनिक असतो. तो कोणालाही देता येत नाही. परंतु, महाराष्ट्राच्या मतदरयाद्यांत दोन मोठे घोळ झाले आहे. एकाच ईपीक नंबरवरती दोन नावे देण्यात आली आहेत. तसेच दुसरा मोठा घोळ म्हणजे एकाच ईपीकवर चार वेगळी नावे असल्याचे उघड झाले आहेत. अशा प्रकारे चाळीस लाखांच्यावर बोगस मतदारंची नोंदणी झाली आहे. आम्ही मागणी करतो की, निवडणूक आयोगाने दोन वेगळ्या समित्या स्थापन कराव्यात आणि कोणत्या राजकीय पक्षाने हे काम केले आहे, याचा शोध घ्यावा. तसेच निवडणूक आयोगाच्या कोणत्या अधिकाऱ्याने त्या राजकीय पक्षाला मदत केली आहे. याचाही शोध घेण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांशिवाय हे कोणी करू शकत नाही. निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर चालते हे यावरून सिद्ध झाले आहे, असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे.

Last Updated : Oct 6, 2019, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details