महाराष्ट्र

maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देणार; प्रहार विद्यार्थी संघटनेची माहिती

By

Published : Aug 27, 2020, 8:28 PM IST

कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात यापुढे होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यात येतील, असे आश्वासन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिले आहे, अशी माहिती प्रहार विद्यार्थी संघटेनेचे अध्यक्ष अ‌ॅड. मनोज टेकाडे यांनी दिली आहे.

mpsc
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मुंबई-कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात यापुढे होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यात येतील, असे आश्वासन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिले आहे, अशी माहिती प्रहार विद्यार्थी संघटेनेचे अध्यक्ष अ‌ॅड. मनोज टेकाडे यांनी दिली आहे. राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेने परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी करण्यात आली होती. परीक्षा केंद्र बदलून मिळणार असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, असे टेकाडे यांनी सांगितले.

अ‌ॅड. मनोज टेकाडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तरीही येत्या काळात या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये म्हणून एमपीएससीने यासंदर्भातील आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षेसाठी जवळचे परीक्षा केंद्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा-जीएसटी मोबदला देणे शक्य नाही; राज्यांपुढे आरबीआयसह बाजारातून कर्ज घेण्याचा सरकारचा प्रस्ताव

पुणे आणि परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर सुमारे 50 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राची निवड केली होती. मात्र, कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर मराठवाडा, विदर्भ आदी भागातून विद्यार्थ्यांना या परीक्षा केंद्रावर येणे कठीण झाले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेकडून करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details