मुंबई - काँग्रेसने दिलेल्या वेदनेतून मी अजूनही बाहेर आलेली नाही. मला यासंदर्भात न्याय हवा आहे. माझी प्रकृती बरी नसते, मात्र ज्या वेळेस मला न्यायालय बोलवले जाते. त्या वेळेस मी न्यायालयात हजर राहते, असे भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी सांगितले.
2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भात साध्वी प्रज्ञासिंहसह, कर्नल प्रसाद पुरोहित व इतर आरोपी आज विशेष न्यायालयामध्ये हजर झाले होते. मात्र आजच्या दिवशी या प्रकरणातील इतर आरोपींमधील विजय राहीलकर व दयानंद पांडे हे दोन आरोपी काही वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर राहिले. त्यामुळे या प्रकरणावर 5 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
साध्वी प्रज्ञासिंह बोलताना... साध्वी प्रज्ञासिंह यांनी माध्यमांशी बोलताना, काँग्रेसने दिलेल्या वेदनेतून मी अजूनही बाहेर आलेली नाही. मला यासंदर्भात न्याय हवा आहे, असे सांगतले. तसेच कोरोना व्हॅक्सिन संदर्भात सांगितलं की, कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात आलेली असून या व्हॅक्सिनमुळे नपुसंकता येते असा जर कोणी भ्रम पसरवत असेल तर त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा विचार करावा. कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यावी.
2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये 100 हून अधिक जण जखमी झाले होते. तर 6 जणांचा या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भातील सुनावणीमध्ये विलंब होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात हस्तक्षेप करावा म्हणून मागणी केली होती. यावर विशेष न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेल्या उत्तरामध्ये डिसेंबर 2020 पासून या संदर्भात नियमित सुनावणी सुरू करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गेल्या सहा महिन्यात केवळ 14 जणांची साक्ष नोंदवण्यात आलेली असून आतापर्यंत 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असल्याचे सांगण्यात आले होते.
बाळासाहेब थोरात देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? मंत्री देशमुखांच्या नावाची चर्चा
कंगनाने ड्रग्ज घेणाऱ्यांची यादी एनसीबीला द्यावी - उर्मिला मातोंडकर