मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंग हिचे वक्तव्य वैयक्तीक आहे. त्यात न्यायालयीन कामकाजाला कुठल्याही प्रकारचा अडथळा आणला जात नाही. त्यामुळे न्यायालय तिचा जामीन रद्द करण्याचा काही विचार करणार नाही, असे विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ म्हणाले. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी ते मुंबईत बोलत होते.
प्रज्ञा सिंगचे 'ते' वक्तव्य न्यायालयाच्या विरोधात नाही, विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांचे मत
अविनाश रसाळ म्हणाले की, प्रज्ञा सिंग आता जामिनावर आहे. तिला काही अटींसह जामीन दिला गेला आहे. तिने जे वक्तव्य केले आहे, ते तिचे वक्तव्य आहे. एक व्यक्ती म्हणून ती बोलली. त्यातून न्यायालयीन कामकाजाला अडथळा येत नाही.
अविनाश रसाळ म्हणाले की, प्रज्ञा सिंग आता जामिनावर आहे. तिला काही अटींसह जामीन दिला गेला आहे. तिने जे वक्तव्य केले आहे, ते तिचे वक्तव्य आहे. एक व्यक्ती म्हणून ती बोलली. त्यातून न्यायालयीन कामकाजाला अडथळा येत नाही. जर तिने केससंबंधी काही वक्तव्य केले असते. कुठला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता किंवा कुठल्या साक्षीदाराला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता, तर ते न्यायालयाच्या विरुद्ध झाले असते. अशा प्रकरणात तिचा जामीन रद्द झाला असता.
प्रज्ञा सिंग ठाकूर ही २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. घटनास्थळी तिची मोटारसायकल आढळून आल्यावर तपासाअंती दहशतवाद विरोधी पथकाने तिला अटक केली होती. त्यानंतर तिच्या ध्वनिमुद्रिका एटीएसच्या हाती लागल्या होत्या. स्तनांचा कर्करोग झाल्याने प्रज्ञा सिंगला जामीन मिळाला आहे. एटीएस आणि एनआयएसने तिच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे.