माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर मुंबई - शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे ( Mp Rahul Shewale ) यांनी कथित प्रेम संबंधातील महिलेवर आरोप केले होते. याप्रकरणी आता राहुल शेवाळे ( Pradip Bhalekar Demand MCOCA Action) यांची देखील MCOCA अंतर्गत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court ) मुख्य न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे. या मागणीवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार राहुल शेवाळे ( Action Against Mp Rahul Shewale ) यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राहुल शेवाळे यांच्या कथित प्रेमप्रकरणात नवा ट्विस्टखासदार राहुल शेवाळे ( Mp Rahul Shewale ) यांच्या कथित प्रेमप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राहुल शेवाळेचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत, ती वस्तुस्थिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल ( Pradip Bhalekar Demand MCOCA Action ) करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शेवाळे यांनी महिलेचे दाऊद सोबत असलेल्या संबंधाची माहिती पोलिसांना ( Mumbai Session Court ) का दिली नाही ? शेवाळे दुबईला किती वेळा गेले? कोणाला भेटले? या संदर्भातील माहितीही मागविण्यात आली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर ( Action Against Mp Rahul Shewale ) यांनी चौकशीसाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे लेखी तक्रार केली आहे.
फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोपदरम्यान राहुल शेवाळे यांनी ( Action Against Mp Rahul Shewale ) रविवारी पत्रकार परिषद घेऊन कथित प्रेम संबंधात असलेल्या महिलेचे दाऊद सोबत संबंध असल्याचे आरोप करत एनआयए चौकशीची मागणी केली होती. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे ( Pradip Bhalekar Demand MCOCA Action ) यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यासंबंधित खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सदर महिला ही दाऊदशी संबंधित असून यात राष्ट्रवादीचा देखील संबंध असल्याचा आरोप केला आहे.
दिशा सालीयन प्रकरण काढल्याने आरोपखासदार राहुल शेवाळे ( Action Against Mp Rahul Shewale ) यांनी मी दिल्लीत सभागृहात दिशा सालीयन प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर एका महिलेच्या ( Mumbai Session Court) आधारे माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. हे प्रकरण जुनेच मात्र आता ते पुन्हा उकरून काढले जात आहे. याच प्रकरणातील काही धक्कादायक खुलासे राहुल शेवाळे यांनी केले होते. महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या विरोधात कटकारस्थान ( Action Against Mp Rahul Shewale ) सुरू होते. त्यानंतर माझी बदनामी करण्यासाठी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. जेव्हा माझ्यावर आरोप झाले त्यानंतर तब्बल एक वर्ष मी माध्यमांशी काहीही बोललो नाही. या सर्व प्रकरणाच्या मागे कोण आहे? याचा मी शोध घेत असल्याचेही शेवाळे यावेळी बोलताना म्हणाले होते.