महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेना-राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी केल्या नियुक्त्या; मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता - राष्ट्रवादी काँग्रेस न्यूज

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Appointments in electricity company by power minister
उर्जामंत्र्यांकडून वीज कंपन्यामध्ये नियुक्त्या

By

Published : Jul 23, 2020, 7:35 AM IST

मुंबई-महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याचा आरोप वेळोवेळी काँग्रेसकडून केला जातो. काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी थेट महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाला अंधारात ठेवून ऊर्जा कंपन्यातील आठ सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऊर्जामंत्री यांनी नियुक्त केलेल्या आठ सदस्यांमध्ये सर्व सदस्य हे काँग्रेसच्या जवळील असल्याने या विषयी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वच निवडतांना स्थगिती दिली जावी, अशी मागणी शिवसेना अनेक राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाण्याची शक्यता आहे.

नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे यवतमाळमधील माजी आमदार कीर्ती गांधी, जळगावमधील काँग्रेसच्या पदाधिकारी ज्योत्स्ना विसपुते, पुण्यामधील महावितरणचे माजी कार्यकारी संचालक उत्तम झाल्टे तर कोल्हापूरचे बॉबी भोसले यांची १५ जुलै तर बीडमधील काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांचे पती अशोक पाटील आणि रवींद्र दळवी तर नागपूरमधील सचिन आनंद मुकेवार व नितीन मारोतराव कुंबलकर यांची २० जुलै रोजी नियुक्ति करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यासंदर्भात मागील दोन दिवसात प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या संमतीने मागील महिन्यात करण्यात आलेल्या मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे प्रकरण अजून ताजे असताना काँग्रेसने आपल्या मित्रपक्षांना विचारात न घेता आठ सदस्यांची नियुक्ती केल्याने हे प्रकरण गाजणार असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details