महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेस्ट दर कपातीचा निर्णय तूर्तास लांबणीवर; स्वस्त प्रवासासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा - बेस्ट समिती

बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट दर कपातीच्या प्रस्तावाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना स्वस्त बेस्ट बस प्रवासासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बेस्ट दर कपातीचा निर्णय तूर्तास लांबणीवर

By

Published : Jun 21, 2019, 6:46 PM IST

Updated : Jun 21, 2019, 6:54 PM IST

मुंबई - आज बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट दर कपातीच्या प्रस्तावाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना स्वस्त बेस्ट बस प्रवासासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य

बेस्टचे दर कमी करण्यासाठी बेस्ट समितीत प्रस्ताव आणण्यात आला. मात्र, घाईघाईत प्रस्ताव सादर न करता सविस्तर प्रस्ताव बेस्ट समितीत मांडण्यात यावा, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली. याला सर्व सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुढील बैठकीत राखून ठेवण्यात आला.

बेस्टचा सर्वात मोठा प्रवासी वर्ग हा कमी अंतरासाठी आहे. त्यामुळे ५ किमी अंतरासाठी साध्या बसचे ५ रुपये आणि एसी बससाठी ६ रुपये तिकीट दर करण्यात येणार आहे. या कमी दरामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होईल. बेस्ट कामगार युनियनने केलेल्या करारानंतर बेस्ट कामगारांचा प्रश्न सुटला. मात्र, मुंबईकरांचा सुलभ व कमी दरातील प्रवासाचा प्रश्न बारगळला. बेस्ट कमी दरात सेवा देतेय त्याचे स्वागत केले आहे. मात्र, त्यात काही त्रुटी होत्या. त्या आधी स्पष्ट करा आणि मग प्रस्ताव बैठकीत मंजुरीसाठी आणावा. त्याला आम्ही मंजुरी देऊ, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले.

बेस्ट भाडे कपात करण्यापूर्वी बेस्टच्या संख्येत वाढ करावी. भाडे तत्वाच्या बससाठी १ हजार २०० चालक भरती करणार आहेत. त्यांना प्रथम सेवेत आणावे. तसेच त्या बसेस कोणत्या डेपोतून कशा पद्धतीने सोडणार, याची माहिती देऊन प्रस्ताव आणावा, अशी मागणी केल्याचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले.

Last Updated : Jun 21, 2019, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details