महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या सेव्हन हिल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी'

कोरोनानुक्त झाल्यानंतर या रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसल्याने वा त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था नसल्याने आजार बळावल्यानंतर ते रुग्णालयात जात आहेत. परिणामी त्यांची तब्येत अधिक खराब होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. हिच गरज लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने सेव्हन हिल्स रुग्णालयात पहिली पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोस्ट कोविड ओपीडी
पोस्ट कोविड ओपीडी

By

Published : Aug 26, 2020, 5:38 PM IST

मुंबई : कोरोनामुक्त झाल्यानंतरही कोरोना अनेकांची पाठ सोडताना दिसत नाही. कारण कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना श्वसनाचे आजार, रक्तदाबाचे आजार आणि मानसिक आजार जडत असून कोरोनाचे इतरही दुष्परिणाम शरीरावर होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर उपचार देण्याची गरज आहे. हिच गरज लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने सेव्हन हिल्स रुग्णालयात पहिली पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी 29 ऑगस्टला या ओपीडीचे उद्घाटन होणार असून 3 सप्टेंबरपासून येथे रुग्णसेवा सुरू होईल अशी माहिती सेव्हन हिल्सचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली आहे.

मुंबईत अनेकजण कोरोनातून ठणठणीत बरे होत आहेत. मात्र, त्याचवेळी काही जणांना कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागत आहे. कारण कोरोनामुक्त झालेल्यांना इतर शारीरिक आणि मानसिक आजार जडत असून यात श्वसनाचे आजार आणि रक्तदाब याचा मुखत्वे समावेश आहे. पण कोरोनानुक्त झाल्यानंतर या रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसल्याने वा त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था नसल्याने आजार बळावल्यानंतर ते रुग्णालयात जात आहेत. परिणामी त्यांची तब्येत अधिक खराब होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर नियमित तपासणी व्हावी यासाठी पहिली पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

शनिवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते या ओपीडीचे उद्घाटन होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष ओपीडी सेवेत दाखल होईल असे अडसूळ यांनी सांगितले आहे. ही ओपीडी नॉन कोविड जागेत असणार आहे. तसेच, दर बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत येथे रुग्णांना तपासण्यात येणार आहे. यामध्ये सर्व आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर असणार आहेत. त्यामुळे ही ओपीडी कोरोनानुक्त रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

हेही वाचा -लोअर परेलमधील नागरिकांनी 40 वर्षांपासून जोपासली 'इको फ्रेंडली' गणेशोत्सवाची परंपरा

ABOUT THE AUTHOR

...view details