महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar On Loksabha Election: लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता- अजित पवार - मविआ बैठक सिल्व्हर ओक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल (रविवारी) संध्याकाळी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. बैठकीत महाविकास आघाडीची 'लाईन ऑफ ॲक्शन' ठरले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (सोमवारी) माध्यमांना दिली.

Ajit Pawar On Loksabha Election
अजित पवार

By

Published : May 15, 2023, 7:42 PM IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीबद्दल अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई:शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची 'सिल्वर ओक' निवासस्थानी रविवारी बैठक पार पडली. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मित्र पक्षांना देखील सोबत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तिन्ही पक्षातील दोन-दोन सदस्य लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात देखील चर्चा करून निर्णय घेतला जाईल.


सर्वांचा उत्साह शिगेला:काही राज्य वगळता 2014 नंतर संपूर्ण देशामध्ये भाजपचे सरकार येत होते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ता उत्साहात असायचे. मात्र, कर्नाटकाच्या निकालानंतर भाजप विरोधातील सर्वच पक्षांचा जोश आणि उत्साह वाढला आहे. कर्नाटक मधील 'एक्झिट पोल'चे अंदाज चुकल्याचे पाहायला मिळाले आहेत. येत्या काळात महाविकास आघाडीचे नियोजन काय असणार आहे? यावर चर्चा झाली. त्यासोबतच वज्रमूठ सभा कोणकोणत्या ठिकाणी घ्यायची यावर देखील चर्चा झाली.


288 जागा वाटपावर चर्चा:गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी स्वतंत्र निवडणुका लढल्या. यावेळी मात्र तिन्ही पक्ष एकत्रित महाविकास आघाडीत आहेत. तिन्ही पक्षांना 48 जागांचे वाटप करावे लागणार आहे. कोणत्या पक्षाने कोणती जागा लढायची यावर देखील चर्चा होणे गरजेचे आहे. विधानसभेच्या 288 जागांबाबतही चर्चा झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे त्यावर देखील चर्चा पार पडली.


सहा सदस्य समिती:महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भातील चर्चा करण्यासाठी सहा जणांची समिती तयार करण्यात येणार आहे. तिन्ही पक्षातून दोन नेत्यांची नावे येणार आहे. सहा सदस्यांची समिती लोकसभेच्या 48 जागा आणि विधानसभेच्या 288 जागांची चर्चा करणार. मित्र पक्षांना सोबत घेण्याबाबत देखील निर्णय झाला आहे. सत्तासंघर्षाच्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय व्यवस्थित असल्याचे देखील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

  1. Pradeep Kurulkar ATS Custody : प्रदीप कुरुलकरला एक दिवसाची 'एटीएस' कोठडी; हनी ट्रॅपमध्ये अजून एक एअर फोर्सचा अधिकारी?
  2. Ajit Pawar on MLAs Disqualified : सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही; विधानानंतर अजित पवार पुन्हा चर्चेत
  3. DCM on Ahmednagar Violence : राज्यात जाणीवपूर्वक दंगल घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details