महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

....तर मुंबईत रात्रीची संचारबंदी लावली जाऊ शकते - पालिका प्रशासनाचे संकेत - suresh kakani on mumbai night curfew

मुंबईमध्ये गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेले अकरा महिने करण्यात आलेल्या उपायोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, गेल्या 20 दिवसांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सर्वस्वी नागरिकांच्या हाती असून लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा असे निर्देश दिले आहेत.

night curfew in mumbai
मुंबईत रात्रीची संचारबंदी

By

Published : Feb 22, 2021, 7:33 PM IST

Updated : Feb 22, 2021, 8:06 PM IST

मुंबई - सार्वजनिक कार्यक्रमांमधून, लग्न समारंभामधून, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्क घातले जात नसल्याने गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात राहावी, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पालिकेकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. सध्या पालिकेच्या अजेंड्यावर लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा विषय नाही. मात्र, पुढील काही दिवसात जर कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर रात्रीची संचारबंदी लावली जाऊ शकते, अशी शक्यता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी माध्यमांशी संवाद साधताना.

मुंबईमध्ये गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेले अकरा महिने करण्यात आलेल्या उपायोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, गेल्या 20 दिवसांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सर्वस्वी नागरिकांच्या हाती असून लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यावर काकाणी बोलत होते.

कार्यक्रमांमधून कोरोना पसरला -

मुंबईत लोकल ट्रेन सुरू झाली. त्यामुळे गर्दी वाढली, हे जरी खरे असले तरी सार्वजनिक कार्यक्रमांमधून, लग्नसमारंभांमधून कोरोना जास्त फैलावला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे काकाणी म्हणाले. सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत त्यातील ८२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. तर १८ टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावे लागते आहे. जे रुग्ण आढळून येत आहेत, ते इमारतीमधून रुग्ण समोर येत आहेत. झोपडपट्ट्या किंवा चाळीमधील रुग्णांचे प्रमाण असल्याचे काकाणी म्हणाले.

पोलीस आणि पालिकेला ५० टक्के दंडाची रक्कम -

मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमांमधून, लग्न समारंभामधून, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्क घालत नसल्याचे समोर आले आहे. अशा ठिकाणी आम्ही लक्ष ठेवून आहोत. नियमांचे पालन केले जात नाही अशा ठिकाणी दंडात्मक आणि कायदेशीर करावी केली जात आहे. क्लिनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली असून दंड वसूल केला जात आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. दंडाच्या रक्कमेतील ५० टक्के रक्कम पोलीस विभागाला तर ५० टक्के रक्कम पालिकेला दिली जाईल, असे काकाणी म्हणाले. नागरिकांकडून दंड वसूल करणे हा आमचा उद्देदेश नसून नागरिकांकडून मास्क, सोशल डिस्टंसिंगचे नियमांचे पालन करून घ्यावे हा उद्देश आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -विरोधी पक्षातील नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी- सुधीर मुनगंटीवार

२० सप्टेंबरची स्थिती कायम -

गणेशोत्सवानंतर सप्टेंबर २०२०मध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर जी तयारी मुंबई महापालिका प्रशासनाने केली होती, त्याच पद्धतीची तयारी आताही पालिका प्रशासनाने केली आहे. कोरोना केअर सेंटर आणि कोरोना जम्बो सेंटरमध्ये सध्या बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर २५ टक्के कार्यरत आहेत. तर ७५ ते ८० टक्के वापरात नाहीत. त्यांना वापरात आणण्यासाठी जोरदार तयारी चालली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा आहे.

आजच पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळा, ऑपरेशन्स, खासगी दवाखाने, महापालिकेचे दवाखाने यांची एक बैठक घेतली. त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या. चाचणीसाठी आलेल्यांचे मोबाईल नंबर, पॅनकार्ड नंबर नोंद करून घेणे, त्यांची चाचणी योग्य प्रकारे करणे, त्यात कोणतीही हयगय होता नये आणि त्याचा अहवाल २४ तासांच्या आत मिळेल असे व्यवस्था करण्याची सक्त सूचना आयुक्तांनी दिल्याचे काकाणी यांनी सांगितले.

चाचण्यांचे उद्दिष्ट साध्य करू -

एकीकडे मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाचे उद्दिष्ठ साध्य होत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना अपेक्षित असलेल्या लसीकरणाच्या १३३ टक्के लसीकरण दोनवेळा झाले आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे आमचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.

Last Updated : Feb 22, 2021, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details