महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad: दाखल गुन्ह्याच्या पार्श्वभुमीवर आव्हाड गृहमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता - Devendra Fadnavis on background of crime filed

Devendra Fadnavis on Jitendra Awhad: एका मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र हे दोन्ही गुन्हे राजकीय सोडभावनेतून आपल्यावर दाखल झाले असल्याचा आरोप जितेंद्रवाडी यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जितेंद्र आव्हाड भेट घेण्याची शक्यता आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

By

Published : Nov 16, 2022, 12:47 PM IST

मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर दाखल झालेल्या दोन गुन्ह्याची पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासाच्या आत ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कळवा मुंब्रा बायपास उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्या यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल: मात्र दाखल केलेल्या गोऱ्या नंतर जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मान्य केला आहे. तसेच हर हर महादेव चित्रपटाला विरोध करत असताना ठाण्यातील एका मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र हे दोन्ही गुन्हे राजकीय सोडभावनेतून आपल्यावर दाखल झाले असल्याचा आरोप जितेंद्रवाडी यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जितेंद्र आव्हाड भेट घेण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल करण्यामागे शकूनी मामाचा हात:आपल्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र ते दोन्ही गुन्हे राजकीय षडयंत्र चा भाग आहे. खास करून विनयभंगाचा गुन्हा आषाढी यंत्रनुसार केला गेला आहे. आपल्याला राजकीय कारकीर्दीतून उध्वस्त करण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी यामागे कोणीतरी शकुनी मामा असल्याची टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाबाबत जितेंद्र आव्हाड आज गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details