मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha elections) अनपेक्षित निकाल आल्यानंतर महाविकासआघाडी मधील शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बाबत नाराजी असल्याची माहिती आहे. त्यामुळे 20 जूनच्या विधान परिषद निवडणुकीत ( Vidhan Parishad elections) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपापले पाहून घ्यावे अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत महा विकास आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत संजय राऊत यांनी सहा अपक्ष आमदारांवर मतदान न केल्याचा आरोप केला. त्यात अजित पवार समर्थक आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील शिवसेनची नाराजीची चर्चा आहे. 20 जून ला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी विधानपरिषदेवर आमदार आला निवडून येण्यासाठी 27 मतांचा कोठा आहे.
आमदारांच्या संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र काँग्रेसने दोन उमेदवार पैकी एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. मग आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी सहकारी पक्ष आणि अपक्ष आमदार यांच्या मदतीची गरज काँग्रेसला लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदार फुटल्यामुळे विधान परिषदेत काय होणार या साची काँग्रेसची चिंता देखील वाढली आहे. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जवळपास 10 मतांची आवश्यकता लागणार आहे.