मुंबई -दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात, महाराष्ट्रातला शेतकरी सशक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या माध्यमातून एकटवला असून नाशिकहून निघालेले हजारो शेतकरी काल (रविवार) मुंबईत धडकले. आज दुपारनंतर शेतकरी राज्यपालांची भेट घेऊन केंद्राने पारित केलेले शेतकरी कायदे रद्द करण्याचे निवेदन राज्यपालांना देणार आहेत.
शेतकरी-पोलीस संघर्ष होण्याची शक्यता
जवळपास 10 हजाराच्यावर शेतकरी आझाद मैदानात जमा झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी राजभवनाच्या दिशेने निघाले तर मुंबईतही ट्रॉफिकची कोंडी होईल. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाऊ शकतो. म्हणून पोलीस शेतकऱ्यांना आझाद मैदानाच्या बाहेर पडू देणार नसल्याची माहिती मिळत आहे. जर शेतकऱ्यांनी आझाद मैदानाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
माहिती देताना विश्वास नांगरे पाटील... महाविकास आघाडीचे नेते शेतकरी मंचावरशेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांच्या मंचावर उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आधीच जाहीर केलं आहे की, ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी मंचावर थेट न जाता व्हर्चुवल माध्यमातून किंवा फोनद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे नेते थेट भेट घेणार आहेत. सकाळपासूनच शेतकरी नेत्यांचे भाषण मंचावरून सुरू होणार असून महाविकास आघाडीचे येणारे नेते ही शेतकऱ्यांचा संबोधन करणार आहेत. दुपारी शेतकरी राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनच्या दिशेने कूच करून आपले निवेदन राज्यपालांना देणार आहेत.
हेही वाचा -किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी कसारा घाट उतरले पायी
हेही वाचा -शेतकऱ्यांचा 'विराट' मोर्चा : डॉ. नवले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित