महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Air Quality Index: मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब, SAFAR इंडियाने केली नोंद - देशाची आर्थिक राजधानी मुंबई

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता 'खराब' श्रेणीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही संस्था हवेतील प्रदुषणाचा अभ्यास करते.

Poor air quality in Mumbai as per SAFAR India
Poor air quality in Mumbai as per SAFAR India

By

Published : Dec 12, 2022, 12:03 PM IST

Updated : Dec 12, 2022, 3:49 PM IST

मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. त्याबाबतचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. त्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता 'खराब' श्रेणीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) संस्थेकडून हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

देशाची आर्थिक राजधानी: देशातील सर्वाधिक वायुप्रदुषण असलेले शहर म्हणून राजधानी दिल्लीची ओळख आहे. आता अशीच ओळख देशाची आर्थिक राजधानी मुंबईचीही होत चालली आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) संस्थेने मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता ( AQI Of Mumbai ) नुकतीच नोंदवली. या नोंदीनुसार मुंबईतील बिकेसी (BKC) परिसरातील हवेची गुणवत्ता रविवारी 11 डिसेंबरला ( Air Quality Index 310) इतकी होती. जी सर्वात वाईट समजली जाते. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता घसरल्याचे आणि ती धोकादायक स्थिती असल्याचे समोर येताच सर्व स्तरातून राज्यसरकारवर टीका होत आहे.

हवेची गुणवत्ता मोजण्याची पद्धत: 201 ते 300 मधील AQI- खराब श्रेणीत मानला जातो. 301-400 मधील AQI- अत्यंत खराब श्रेणीत मानला जातो. 401-500मधील AQI- गंभीर श्रेणीत मानला जातो.

हवेची गुणत्ता चांगली कधी?: शून्य आणि 50 मधील AQI- चांगला या श्रेणीत मानला जातो. 51 आणि 100 मधील AQI- समाधानकारक या श्रेणीत मानला जातो. 101 आणि 200 मधील AQI- मध्यम- या श्रेणीत मानला जातो.

Last Updated : Dec 12, 2022, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details