महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Political reactions : शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी-अमोल कोल्हे

सुधांशू त्रिवेदी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe on Governor Sudhanshu Trivedi ) यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी ( BJP should clarify its position regarding Chhatrapati ) असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

sudhanshu trivedi Bhagat singh Koshyari
sudhanshu trivedi Bhagat singh Koshyari

By

Published : Nov 21, 2022, 12:45 PM IST

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी ( BJP should clarify its position regarding Chhatrapati ) असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe on Governor Sudhanshu Trivedi ) यांनी केली आहे.

अपमान केला : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना त्यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवरायांना माफी वीर म्हणून संबोधणाऱ्या त्रिवेदी यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि छत्रपतींच्या कार्याची माहिती नाही. गनिमी कावा म्हणजे नक्की काय असतं आणि गनिमी काव्याचे युद्धशास्त्र महाराजांनी कसे रुजवले याबद्दल माहिती नसलेल्या त्रिवेदी यांनी छत्रपतींचा अपमान केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे

भाजपने भूमिका स्पष्ट करावी :दरम्यान भारतीय जनता पक्षाने वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला ( Governor Bhagat Singh Koshyari statement ) आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भारतीय जनता पक्षाची नेमकी काय भूमिका आहे. हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे तसेच सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपतींची आणि महाराष्ट्राची माफी ( Governor should apologize Chhatrapati ) मागावी .अशी मागणी ही खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details