महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Reactions On Sharad Pawar Resignation : शरद पवारांची निवृत्ती; राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाला विरोध केला आहे.

Sharad Pawar:
शरद पवार

By

Published : May 2, 2023, 2:01 PM IST

Updated : May 2, 2023, 6:59 PM IST

मुंबई :शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णयावरून कार्यकर्त्ये भावूक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या या निवृत्तीच्या निर्णयाला विरोध केला आहे. पक्षातील वरिष्ठांनी ठरवावे,नवा अध्यक्ष कोण होणार हे असेही यावेळी पवारांनी सांगितले आहे. 'लोक माझे सांगाती' या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, त्यांनी राजीनामा जाहीर करण्यापूर्वी कोणालाच विश्वासात घेतले नाही. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. ते ढसढसा रडले. 'साहेबांना परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही', असे जयंत पाटील यांनी भावुक वक्तव्य केले.

राष्ट्रवादीही कमकुवत होणार :शरद पवार यांच्या राजीनाम्यावर त्यांची बहीण सरोज पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'शरद पवार यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला याचे मला खूप वाईट वाटते. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. पवारांच्या आजच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे तर मोठे नुकसान होणार आहेच, पण राष्ट्रवादीही कमकुवत होणार आहे. जनतेच्या भावना ओळखून राजीनामा मागे घ्यावा, असे सरोज पाटील म्हणाल्या.

शरद पवारांचे महत्त्व अनन्यसाधारण :शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आज देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठा लढा सुरू आहे. त्यातही शरद पवारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ते राजकारणापासून दूर जाणार नाहीत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

पवारांना राजकारणात महत्वाचे स्थान : खासदार शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार अध्यक्षपदावरून निवृत्त झाले तरी राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान असेल, असे चव्हाण म्हणाले.

राजीनाम्याची घोषणा योग्य नाही :शरद पवार यांनी राजीनाम्याचे कारण दिलेले नाही, असे अजित म्हणाले. असा राजीनामा जाहीर करणे योग्य नाही. पक्षश्रेष्ठींची बैठक होणार आहे. कुटुंबातील सदस्यही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यानंतर पक्षाची मुख्य समिती राजीनाम्याबाबत निर्णय घेईल. राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीच्या निर्णयाचे पवार पालन करतील, अशी आशा आहे. नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, अशी पवारांची इच्छा होती, असेही ते पुढे म्हणाले.पक्षाचे काम असेच सुरू राहणार असल्याचे अजित म्हणाले. शरद पवारांची साथ आमच्या पाठीशी आहे. पवारसाहेबांनी पक्ष नव्हे तर पद सोडले आहे, असे ते म्हणाले. तो आम्हाला मार्गदर्शन करत राहील.

जयंत पाटील भावूक झाले :त्याचवेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी शरद पवार यांनी कोणालाही सांगितले नव्हते. पवार आपल्या राजीनाम्यावर फेरविचार करतील, अशी आशा आहे. सोबतच जयंत पाटील म्हणाले की, पवारांशिवाय ते जनतेत कसे जाणार असे सांगताच पाटील यांचे डोळे भरुन आले.

राज्याच्या राजकारणाचा आत्मा :शिवसेनेचे संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मराठीत ट्विट केले आहे. गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. बाळासाहेबांप्रमाणेच पवार साहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत.

आघाडीवर परिणाम होणार नाही :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले शरद पवारांच्या राजीनाम्यावर म्हणाले की, शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल आणि त्यांच्या पक्षात काय चालले आहे, याबद्दल मला काहीही माहिती नाही. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या राजीनामा हे राष्ट्रवादीचे मोठे नुकसान आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडीला यात काहीच अडचण नाही. शरद पवार हे शेवटच्या श्वासापर्यंत सार्वजनिक जीवनात राहतील, अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी आज राजीनामा दिला. तो का दिला? हे आम्ही सांगू शकत नाही. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही. आम्हाला आशा आहे की, नवे अध्यक्ष एमव्हीएसोबत राहतील.

पवारांशिवाय पक्ष चालणार नाही :पवारांशिवाय पक्ष चालणार नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. तर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर पवार जो निर्णय घेतील तोच वैध असेल, असेही ते म्हणाले. त्यामुळे समर्थकांमध्ये निराशा दिसून येत आहे.

हेही वाचा : Sharad Pawar News : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची शरद पवारांची भर कार्यक्रमात घोषणा, कार्यकर्त्यांचा निर्णयाला विरोध

Last Updated : May 2, 2023, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details