मुंबई - सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजपला वगळून सरकार स्थापन व्हावे, असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई कवाडे गट, समाजवादी पक्ष, जनता दल, रिपाई खरात गट, श्रमिक मुक्ती दल आदींसह इतर सर्व घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.