मुंबई : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण असे विचारेल होते. हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. जसे चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण तसेच समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल होते. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंग कोशारीजी, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती असेही त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट :महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाही आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्याला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही! असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
अमोल मिटकरी यांचे ट्विट : उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली.. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
जयंत पाटील यांचे ट्विट :राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी स्वीकारला. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, त्यामुळेच राष्ट्रपतींनी राज्यपालांना पायउतार करण्याचा घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस हे भारतीय जनता पक्षाच्या हातातले बाहुले बनणार नाहीत अशी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.